07 January, 2020

महा-रेशीम अभियान-2020 चा शुभारंभ





महा-रेशीम अभियान-2020 चा शुभारंभ

हिंगोली, दि.7 : वस्त्रोद्योग विभागातंर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली आयोजीत महारेशीम अभियान-2020 चा प्रचार रथाला अप्पर जिल्हाधिकारी जगदीश  मिणीयार निवासी  उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महा-रेशीम अभियान-2020 चा शुभारंभ करण्यात आला.
संपुर्ण राज्यात शेतीला उत्तम जोडधंदा असलेल्या रेशीम शेतीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी रेशीम संचालनालयाकडुन दरवर्षी महा-रेशीम अभियानाचे आयोजन करण्यात येते. या अभियान कालावधीमध्ये गावोगावी  जावून रेशीम शेती विषयक प्रचार प्रसार जनजागृती करुन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येतो. या वर्षी 2020-2021 करीता महा-रेशीम अभियान दि. 07 ते 21 जानेवारी, 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली नांव नोंदणी करुन पारंपारीक  शेतीला  उत्तम असा जोडधंद्याची साथ देवून स्वत:ची आर्थिक  स्थिती बळकट करावी असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार निवासी  उपजिल्हाधिकारी चंद्रकांत  सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना केले.
            या वेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, वरिष्ठ  तां. सहाय्यक अशोकराव वडवळे, क्षेत्र सहाय्यक प्रविण चव्हाण आदी उपस्थित होते.
****




No comments: