जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती
निवडीसाठी 14 जानेवारी रोजी सभा
हिंगोली,दि.4:
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961
चे कलम 83 उपकलम 1-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती
पदाची निवड करण्यासाठी दिनांक 14 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता हिंगोली जिल्हा
परिषदेच्या सभागृहात सभा आयोजित केली आहे. याकरीता उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांची
या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
वरिल विषय समित्यांची सभापती पदाची निवडणूक ही जिल्हा परिषद
पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय
समित्यांचे सभापती) व (पंचायत समित्याचे सभापती, उपसभापती) निवडणूक नियम-1962 त्याखालील नियम यामधील तरतुदीनुसार घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी, हिंगोली
यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment