शासकीय तंत्रनिकेतन येथे विज्ञान प्रदर्शनी
संपन्न
हिंगोली,दि.4: येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत दि. 3 जानेवारी रोजी
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी तसेच निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धांचे आयोजन
करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील ए.बी.एम. इंग्लिश स्कूल हिंगोली, जिल्हा परिषद
बहुविध प्रशाला, गोरखनाथ माध्यमिक विद्यालय चौंढी, अहिल्यादेवी होळकर कन्या शाळा वसमत,
बालाजी विद्यालय, वाई, ता. कळमनुरी, विद्यासागर विद्यालय खानापूर, जिल्हा परिषद माध्यमिक
शाळा, वसमत या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी
अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी
पी. बी. पावसे, उपशिक्षणाधिकारी श्री. मलदोडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्वरांच्या हस्ते
पारितोषिके वितरीत करण्यात आली. यामध्ये निबंध स्पर्धेत बालाजी विद्यालय, वाई येथील
पांडूरंग रिठे, भित्तीपत्रक स्पर्धेत गोरखनाथ विद्यालय आंबा चोंढी येथील ज्ञानोजी भोसले,
विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेत जिल्हा परिषद बहुविध प्रशाला हिंगोली येथील हर्षवर्धन पुंडगे
व ग्रुप, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेत अहिल्यादेवी होळकर वसमत येथील वैष्णवी डुकरे यांनी
प्रथम विजेत्यांचा मान मिळविला.
****
No comments:
Post a Comment