शासकीय तंत्रनिकेतन येथे
विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
हिंगोली, दि.14 : इंटरइंजिनिअरींग
डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत
w-2 झोन मराठवाडा विभाग मुलींच्या दिनांक
14 व 15 जानेवारी 2020 दरम्यान स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. 14 जानेवारी रोजी स्पर्धेची सुरुवात ही उद्घाटन समारंभ
व ध्वजारोहणाने करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्राचार्य
डॉ. सावंत होते व ध्वजारोहण जिल्हा पोलीस अधीक्षक
योगेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थीनींचे
पथसंचालन करण्यात आले व खेळामध्ये खेळताना खिलाडूवृत्ती अंगीकारावी याबाबत शपथ देण्यात
आली. या स्पर्धेत w-2 झोनमधील हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातील
तंत्रशिक्षण पदविका घेणाऱ्या संस्थेतील जवळपास 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन,
टेबलटेनिस, बास्केटबॉल, चेस, कॅरम, ॲथलेटीक्स इत्यादी 14 प्रकारच्या खेळांचा समावेश
आहे.
00000
No comments:
Post a Comment