पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा जिल्हा दौरा
हिंगोली,
दि.24 : राज्याच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1.00 वाजता कार्यकारी समितीची बैठक व जिल्हा नियोजन समितीची
बैठक (स्थळ: जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), दुपारी 2.00 वाजता रब्बी पिक पाहणी आढावा बैठक (स्थळ :
जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), दुपारी
3.00 वाजता अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शासकीय मदत वाटप (स्थळ : जिल्हा नियोजन
समिती सभागृह, हिंगोली), दुपारी 4.00 वाजता कर्जमाफी आढावा/ बँकेना मिळालेली हमी (स्थळ : जिल्हा नियोजन
समिती सभागृह, हिंगोली), दुपारी 5.00 वाजता पुनर्गठीत कर्जाबाबत बँकांची कार्यवाही
व सद्य:स्थिती (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), सायंकाळी 6.00 वाजता
शिव भोजन थाळी (स्थळ : जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली), बैठकीनंतर राखीव (शासकीय
विश्रामगृह, हिंगोली), सोयीनुसार हिंगोली येथून कळमनुरीकडे मोटारीने प्रयाण. प्रियदर्शिनी
सेवा संस्था कळमनुरी च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती, सोयीनुसार हिंगोलीकडे
मोटारीने प्रयाण शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम.
रविवार, दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी
सकाळी 7.40 वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शिवाजी नगर, हिंगोली येथे “सार्वभौमत्व संविधानाचे
जनहित सर्वांचे” संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन कार्यक्रमास उपस्थिती.,
सकाळी 9.15 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन राष्ट्रध्वजारोहन कार्यक्रमास
उपस्थिती (स्थळ : संत नामदेव, पोलीस कवायत मैदान, हिंगोली), कार्यक्रमानंतर मोटारीने
धर्माबाद/ बासरकडे प्रयाण करतील.
000000
No comments:
Post a Comment