हिंगोली,
दि. 23 : राज्य क्रीडा व युवक
सेवा संचालनालयाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये सन 2020-21 या वर्षात युवा महोत्सव
या योजनेंतर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन /
व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 28 डिसेंबर, 2020 रोजी करण्यात येणार
आहे. देशात कोव्हिड-19 महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार होऊन कोणत्याही प्रकारचे
एकत्रीकरणास मनाई आहे. म्हणून या वर्षी शासनाच्या प्राप्त सूचनानुसार युवा
महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन / व्हर्च्युअल पध्दतीने करण्यात येणार आहे. यामध्ये
सहभागी कलाकारांनी आपले सादरीकरण हे विद्यालय, महाविद्यालयाच्या रंगमंचावर किंवा
आपल्या आवडत्या रंगमंचावर करावे. ही अत्यंत महत्वाची सूचना असून या सूचनेचे सर्व
संघानी काटेकोरपणे पालन करावे.
युवा महोत्सवात
खालील कलाप्रकारांचा समावेश आहे.
सांघिक
बाबी : (1) लोकनृत्य या कला प्रकारासाठी
कलाकारांची संख्या सहकलाकारासह 20 असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 15 मिनिटाचा
वेळ असणार आहे. (2) लोकगीत या कला प्रकारासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह 20
असणे आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 07 मिनिटाचा वेळ असणार आहे.
वैयक्तीक
बाबी : (1) एकांकिका (इंग्रजी
किंवा हिंदी) ही कला सादर करण्यासाठी कलाकारांची संख्या सहकलाकारासह 12 असणे
आवश्यक असून कला सादर करण्यासाठी 45 मिनिटाचा वेळ असणार आहे. (2) शास्त्रीय गायन
(हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी) ही कला सादर करण्यासाठी कलाकराची संख्या एक असून
यासाठी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. (3) शास्त्रीय वाद्य (हिंदुस्थानी किंवा
कर्नाटकी) यामध्ये सितार, बासरी, वीणा ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या
प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. 4)
तबला, मृदंग, हार्मोनियम (लाईट), गिटार ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या
प्रत्येकी एक याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. (5) शास्त्रीय नृत्य यामध्ये मणिपुरी, ओडीसी,
भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी ही कला सादर करण्यासाठी कलाकाराची संख्या प्रत्येकी एक
याप्रमाणे असून ही कला सादर प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ असणार आहे. (6) वकृत्व
(हिंदी किंवा इंग्रजी) ही कला सादर करण्यासाठी कलाकराची संख्या एक असून यासाठी 04
मिनिटाचा वेळ असणार आहे. असे एकूण 56 कलाकारांची संख्या असणार आहे.
वरील कला
प्रकारामध्ये कला सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात सहभागी
होण्यासाठी जिल्ह्यातील 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक-युवती, युवक मंडळे,
विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होऊ शकतात. युवक
महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्या प्रवेशिका मंडळाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या
लेटरपॅडवर कलाकारांचे नाव, जन्म दिनांक व स्वाक्षरी इत्यादी माहिती भरुन 26
डिसेंबर, 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल,
लिंबाळा, हिंगोली येथे प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा कार्यालयाच्या ई-मेल dsohingoli01@gmail.com किंवा व्हॉट्सॲप
नं. शेख वसीम-9527120645, संजय बेतेवार-9423306345 यावर सादर करावा. स्पर्धकांनी
आपल्या जन्म तारखेचा पुरावा सादर करावा लागेल. युवा महोत्सवाचे आयोजन हे आपल्या
महाविद्यालयातील रंगमंच, व्यासपीठावर सादर करावयाचे आहे. सदरील सादरीकरणासाठी
आपणास वेळ निश्चित करुन देण्यात येईल त्यावेळेस त्या संघांनी ऑनलाईन उपस्थित राहुन
आपली कामगिरी कौशल्य (प्रफार्मस) दाखवायचे आहे.
या युवा महोत्सवाचे परिक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे
पंचाच्या/निरीक्षक यांच्या उपस्थित स्पर्धा आयोजनाच्या दिवशी होणार आहे. या
स्पर्धेतील विजयी संघास पुढील विभागीय स्पर्धेसाठी ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीनेच
सादरीकरण करावयाचे आहे. प्रत्येक कलाकाराने
त्यांना आवश्यक असणारे वेशभुषा, ड्रेस, साहित्य, वाद्य, मेकअप साहित्यासह
आपले सादरीकरण करावे. तसेच सी.डी. कॅसेटस, डि.व्ही.डी. यावर कला सादर करता येणार
नाही. कला सादर करताना कुठल्याही प्रकारची इजा दुखापत अथवा गंभीर इजा झाल्यास
आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संघ व्यवस्थापक व कलाकार
यांची राहिल. पंचानी दिलेला निर्णय अंतिम राहील.
हिंगोली जिल्ह्यातील युवक-युवतीनी, शाळा, महाविद्यालय, युवक मंडळे
यातील इच्छुक कलावंतांनी स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवक महोत्सवात
ऑनलाईन/व्हर्च्युअल पध्दतीने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेली कला गुण सादर करावेत,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे
*****