सातव्या
आर्थिक गणनेसाठीची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न
हिंगोली, दि.29:सातव्या आर्थिक गणनेसाठी गठीत
जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक 28 डिसेंबर, 2020 रोजी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी श्री.
गिरगावकर, नगर प्रशासन अधिकारी शैलेश
फडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आर्थिक गणनेच्या
कामामध्ये कुठलीही व्यावसायिक आस्थापना सुटणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश
दिले. तसेच ज्या भागामध्ये गणनेचे काम शिल्लक असेल त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि
जनतेचे सहकार्य घेवुन सदर गणनेचे काम पुर्ण करावे अशा सूचना केल्या. समितीचे सदस्य
सचिव तथा जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर यांनी आर्थिक गणनेचे काम हे
जिल्ह्याच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत करण्यात येत असून जिल्ह्यात गणनेचे काम
जवळपास पूर्ण होत आले आहे फक्त काही भागामध्ये गणनेचे काम शिल्लक असुन ते लवकरच
पुर्ण होणार असल्याचे सांगितले.
****
No comments:
Post a Comment