हिंगोली, दि. 24 : शहरातील
नांदेड नाका परिसर, बस स्थानक, मच्छी मार्केट, इंदिरा चौक, हॉटेल व गॅरेज इ. ठिकाणी
पथकांकडून बालकामगार शोध मोहिम राबविण्यात आली. ज्या मध्ये बालकामगार, अनाथ, निराधार,
निराश्रीत व एक पालकत्व असलेल्या बालकांना बाल कल्याण समिती समोर हजर करुन त्यांना
बालगृहात प्रवेश दिला जातो. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. तसेच
त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत 18 वर्षाखालील बालकांना शासनाच्या वतीने मासिक 425 रुपये
लाभ दिला जातो. यामुळे साहजिकच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुखकर होण्यास मदत
होते. शहरात मोहिम राबवित असतांना सापडलेल्या 15 बालकामगारांचे व त्यांच्या पालकांचे
जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने समुपदेशन करुन त्यांची सुटका केली व पोलीस प्रशासनाच्या
वतीने त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
येथील पोलीस
अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल
संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी ऑपरेशन
मुस्कान मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,
पोलीस उप अधीक्षक आश्विनी जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे,
तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले होते.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पोलीस
अधीक्षक कार्यालयातील पोलीस जमादार शेख इस्माईल, म.पो.अ. श्रीमती स्वाती डोल्हारे,
संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण,
कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य
कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी मोहिम राबविण्यासाठी सहकार्य केले.
*****
No comments:
Post a Comment