हिंगोली, दि. 17 : राज्य
निवडणूक आयोगाने दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020
निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श
आचारसंहिता अंमलात आल्याने हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण
प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि
मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी
हिंगोली जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. अशा ग्रामपंचायती
मधील दि. 14 जानेवारी, 2021 व दि. 15 जानेवारी, 2021 रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द
करण्याचे आदेश प्र.जिल्हादंडाधिकारी शंकर बरगे यांनी फौजदारी
प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये दिले आहेत.
हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून दि. 14 जानेवारी, 2021
रोजीचे मध्यरात्री 12.00 वाजेपासून ते 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाची संपूर्ण
प्रक्रीया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य
नसल्यामूळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकांवर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी
द्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.
*****
No comments:
Post a Comment