08 December, 2020

महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विभागीय कार्यशाळा संपन्न

  

हिंगोली, दि. 8:  केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कुत ग्रामीण आवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण, ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हा तालुका व ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विभाग स्तरावर कार्यशाळेचे आयोजन आज दि. ०८ डिसेंबर, २०२० रोजी दुरचित्र संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस विभागीय स्तरावर उपआयुक्त यांनी गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण घरकूलात गुणवत्ता आणणे तसेच शासकीय यंत्रणेबरोबर समाजातील सर्व घटक पंचायतराज संस्था स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खाजगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लाभार्थी, ग्रामस्थ यांचा सक्रीय सहभाग वाढवणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून आणणे हा उद्देश आहे.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याची महाआवास अभियानात दिलेल्या उद्देशांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगुन सदर अभियानामध्ये अजुन चांगली कामगिरी करून जिल्ह्याने राज्यात प्रथम येण्याकरीता प्रयत्न करावे, असे सहा. आयुक्त (विकास) विणा सुपेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा व प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी यांना शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यशाळेस विभागीय स्तरावर उपआयुक्त (विकास) डॉ. अनिल गोटे व सहा. आयुक्त (विकास) विणा सुपेकर यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

सदरील कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, एकात्मिक आदिवासी विभागाचे प्रकल्प अभिकारी विशाल राठोड, गट विकास अधिकारी डॉ. एम. पी पोहरे, डॉ.आदिनाथ आंधळे, विठ्ठल सुरोशे, जे. एम. साहु, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे शशिकांत सावंत, समाज कल्याण, जिल्हा कामगार अधिकारी, पंचायत समिती व जि.ग्रा.वि.यंत्रणा येथील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.           

****

No comments: