02 December, 2020

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व अनुदानित संस्थांनी कुशल पदाच्या सेवा पदवीधर अंशकालीन उमेदवारातून घेण्याचे आवाहन

 

         हिंगोली,दि. 02 : राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर तसेच शासन अनुदानित संस्था (सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, पाळणा घरे, वृध्दाश्रम, वस्तीगृहे, महिला आश्रम, बालशिशू गृहे) आणि राज्यभरात पीपीपी तत्वावर सुरु असलेल्या प्रकल्पामध्ये ज्या पदांच्या सेवा वैयक्तीकरित्या संस्था, ठेकेदाराकडून घेण्यात येतात. अशा जिल्ह्यातील शासकीय कार्यालय प्रमुखांनी तसेच अनुदानित संस्था चालकांनी लिपिक-टंकलेखक, शिपाई व वाहनचालक यासारखे कार्यालयाच्या कामकाजासाठी प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कुशल पदाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे संस्था, ठेकेदाराकडून घेण्यापूर्वी पदवीधर अंशकालीन उमेदवारांकडून प्रथम प्राधान्य देऊन काम करुन घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: