हिंगोली, दि. 14 : राज्य निवडणूक
आयोगाने जुलै 2020 ते
डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या हिंगोली जिल्हयातील 495 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक
कार्यक्रमाकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक हा 28 फेब्रुवारी,
2021 किंवा त्यापूर्वीचा असेल त्याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र
देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी
समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या
दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर
करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. 11
डिसेंबर, 2020 रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून विहित
नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर
केलेल्या अर्जाची पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या सूचना राज्य
निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित निवडणूक अधिकारी, निवडणूक
निर्णय अधिकारी व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिल्या आहेत.
******
No comments:
Post a Comment