महिला उद्योजकांनी उद्योजकीय कौशल्य प्रशिक्षणासाठी
25 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 18 : महाराष्ट्र राज्य नाविण्यता सोसायटीच्या वतीने
महाराष्ट्र महिला आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम हा महाराष्ट्रातील महत्वकांक्षी आणि
नाविण्यपूर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात
येत आहे. या उपक्रमामध्ये महिलांना उद्योजकीय कौशल्य व त्यासंबंधीचे प्रशिक्षण
दिले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध अग्रगण्य उद्योजकांकडून मार्गदर्शन केले
जाणार आहे. यासाठी इच्छूक महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु
आहे.
या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी
महाराष्ट्र राज्य नाविण्यता सोसायटीच्या www.mahawe.in
या संकेतस्थळावर दि. 25 फेब्रुवारी, 2022 पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. वरील
संकेतस्थळावर या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत
जास्त महिला उद्योजकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन रा. म. कोल्हे,
सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment