22 February, 2022

 

जिल्हास्तरीय निवड समितीच्या सदस्यपदासाठी

कला क्षेत्रातील कलाकारांनी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील कलावंतांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करावयाची आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये कला क्षेत्राशी निगडीत जिल्ह्यातील एकूण 10 सन्माननीय कलाकारांची सदस्यपदी निवड करावयाची आहे.

यासाठी  निवड समितीमध्ये काम करु इच्छिणाऱ्या कलावंतांनी दि. 25 फेब्रुवारी, 2022 पर्यंत आपल्या कला क्षेत्राशी निगडीत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन आर. एच. तिडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

*****

No comments: