राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2021 साठी
प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ
· प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे
आवाहन
हिंगोली (जिमाका) दि. 16 :- माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट
लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट
छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या
जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी
दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021
पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या
प्रवेशिका दि.15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मागविण्यात आल्या होत्या, तथापि
प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे
नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि
महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित
जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा
राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32
येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.
0000000
No comments:
Post a Comment