राष्ट्रीय
लोकअदालतीचे 12 मार्चला आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 16 : येथील जिल्हा न्यायालयात व त्याअंतर्गत येणाऱ्या
विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ हिंगोली यांच्या संयुक्त
विद्यमाने हिंगोली न्यायालय परिसरात शनिवार, दि. 12 मार्च, 2022 रोजी सकाळी 10.30
वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये
भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी
प्रकरणे, वैवाहिक, कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अपराध नियम 138 खालील
प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
ही सर्व प्रकरणे
आपापसातील तडजोडीद्वारे निकाली काढता येवू शकतील. त्यामुळे या राष्ट्रीय
लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळीनी कोविड-19 बाबत सर्व शासकीय सूचनांचे,
आदेशांचे पालन करुन उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन हिंगोली तालुका विधी
समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-1 व हिंगोली वकील संघाच्या अध्यक्षांनी केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment