अनाथ प्रवर्गातून
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी कु. कैलास ढोकर यांची
निवड
हिंगोली, (जिमाका) दि.2 :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील
एकूण 15 बालकांचे अनाथ प्रमाणपत्र प्रस्ताव विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास औरंगाबाद
विभाग औरंगाबद यांना पाठविण्यात आले होते. त्यापैकी कैलास शेषेराव ढोकर यांची अनाथ प्रवर्गातून वैद्यकीय (MBBS) शिक्षणाकरीता
निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अभिनंदन केले व अनाथ
प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील कैलास शेषेराव ढोकर या बालकाने अनाथ
प्रमाणपत्र मिळणे करीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांचेकडे
अर्ज दाखल केला होता. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015अन्वये काळजी
व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा
दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे अनाथ मुलांना
राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा या करीता अनाथांना शिक्षण व नोकरीमध्ये
1 टक्का आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परिविक्षा अधिकारी, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक),
बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) क्षेत्र बाह्य कार्यकर्ता आदी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment