शिवछत्रपती क्रीडा पीठाअंतर्गत विविध क्रीडा प्रबोधनीमध्ये
सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीव्दारे प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 09 : राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण,
शिक्षण, भोजन, निवास अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधनी अंतर्गत खेळाडूंना देण्यात
येत आहेत.
राज्यातील
क्रीडा प्रबोधनीमध्ये सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांव्दारे निवासी व अनिवासी
खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यामधे अमरावती - आर्चरी ज्युडो, नागपूर-हॅन्डबाल,
अॅथेलेटिक्स, अकोला-बॉक्सिंग, गडचिरोली- अॅथेलेटिक्स, ठाणे-बॅडमिंटन, नाशिक-शुटींग,
अथलेटिक्स, कोल्हापुर-शुटींग, कुस्ती, औरंगाबाद- अथेलेटिक्स, हॉकी, पुणे - टेबल टेनिस,
वेटलिफ्टीग, जिम्नॅस्टीक या खेळांचा समावेश असून याची अर्हता खालील प्रमाणे आहे.
सरळ प्रवेश प्रक्रिया : क्रीडा प्रबोधनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर
पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे. अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती
समक्ष देवून प्रवेश निश्चित केला जाईल.
खेळनिहाय कौशल्य चाचणी :
क्रीडा प्रबोधनीत असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना त्यांचे वय
19 वर्षाच्या आतील आहे,अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचण्यांचे
आयोजन करुन गुणाणुक्रमे प्रवेश निश्चत केला जाईल.
अनिवासी प्रवेश प्रक्रिया :
अनिवासी क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रवेशासाठी अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम,
व्दितीय व तृतीय स्थान प्राप्त कऱणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.
इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्यांची चाचणी घेऊन त्या आधारे
खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल.
विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांक
व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रांसह क्रीडा प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला
इत्यादी माहितीसह दिनांक 15 फेब्रुवारी,
2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर
करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमओद्दीन फारुखी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment