मराठी
भाषा दिनानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 27 : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य
कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. त्यानिमित्ताने येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठीतील
विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.
महेश मंगनाळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. महेश मंगनाळे
यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, मराठी
ही ज्ञान भाषा होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक अशोक
अर्धापूरकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, औरंगाबाद विभाग
ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलिंद
सोनकांबळे, रामभाऊ पुनसे व
ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे ग्रंथप्रदर्शन जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले
असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment