25 May, 2021

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तातडीने सादर करावे

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : ज्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत हयातीचे प्रमाणपत्र अद्यापपर्यंत सादर केले नाही त्यांनी तातडीने बँकेत सादर करुन त्याची साक्षांकित प्रत कोषागार कार्यालयाच्या  to.hingoli@zillamahakosh.in या ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच ज्या बँकेकडे हयात प्रमाणपत्र जमा झाले असतील त्यांनीही कोषागार कार्यालयाकडे विनाविलंब पाठवावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

***** 

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 62 रुग्ण ; तर 55 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  500 रुग्णांवर उपचार सुरु तर तीन रुग्णांचा मृत्यू

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 62 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती, सेनगांव परिसर 08 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 03 व्यक्ती  तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 22 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती, कळमनुरी परिसर 09 व्यक्ती, सेनगाव परिसर 10 व्यक्ती, असे एकूण 62 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 55 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 178 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 26 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 204 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 478 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 640 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 500  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 338 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

जि.प.च्या शिक्षण व अर्थ सभापती विरुध्द अविश्वास ठराव पारित करण्यासाठी 4 जून रोजी विशेष सभेचे आयोजन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : संजय बालासाहेब देशमुख व इतर जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषद हिंगोलीच्या शिक्षण व अर्थ सभापती सौ. रत्नमाला प्रभाकरराव चव्हाण यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत कामकाजावर नाराज असून असमाधानी आहेत. त्यांच्या कामकाजावर विश्वास नसल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 87 अन्वये श्रीमती रत्नमाला प्रभाकरराव चव्हाण सभापती, शिक्षण व अर्थ समिती जि. प. हिंगोली यांच्या विरुध्द अविश्वास ठराव दाखल केला केला आहे.  असून उक्त ठरावावर विचार करुन सभा बोलविण्यात यावी असे नमूद केले आहे.

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 49 (3) व (4) च्या तरतुदी नुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी कोव्हिड-19 च्या नियमाचे पालन करुन उक्त सभापती विरुध्द जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 49 (3) अन्वये अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी दि. 04 जून 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषदेची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उक्त सभापती विरुध्द अविश्वास ठराव पारीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिनियमातील कलम 49 (4) नुसार पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांना प्राधिकृत केले आहे.

                                                                          ****                                       

24 May, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 52 रुग्ण ; तर 71 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 496 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णांचा मृत्यू

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 52 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, सेनगांव परिसर 07 व्यक्ती, कळमनुरी परिसर 06 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 09 व्यक्ती, औंढा परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 09 व्यक्ती, सेनगाव परिसर 13 व्यक्ती, वसमत परिसर 01 व्यक्ती असे एकूण 52 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 71 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 170 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 26 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 196 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 416 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 585 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 496  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 335 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

जिल्ह्यात सर्वत्र कलम 37 (1) (3) लागू

 

             हिंगोली (जिमाका), दि. 24 :  जिल्ह्यात दि. 26 मे, 2021 रोजी बौध्दपोर्णिमा आहे. कोरोना (कोविड-19) या विषाणूचा सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त चालू आहे.

तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संधटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागणी संदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) लागू करण्यात आला आहे. हा आदेश 20 मे ते 3 जून, 2021 रोजी 24.00 वाजेपर्यंत लागू असेल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळवले आहे.

या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुक बाळगता येणार नाही. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगता येणार नाही. दगड, क्षेपणिक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही. आवेषी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नीतीमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगण्यास मनाई असेल. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना दुखावतील असे असभ्य वर्तन करता येणार नाही. पाच किंवा अधिक व्यक्तींना रस्त्यावर जमता येणार नाही. मात्र शासकीय कामावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी , विवाह अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, परवानगी दिलेले मिरवणूक कार्यक्रमास हे आदेश लागू होणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रम मिरवणुकीस परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधिक्षक अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*****

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा

            हिंगोली,दि.24: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री  प्रा. वर्षाताई गायकवाड या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. 

सोमवार, दि. 24 मे, 2021 रोजी सायंकाळी 05.00 वाजता औरंगाबाद येथून कळमनुरी, जि. हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 09.30 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी जि. हिंगोली येथे आगमन व राखीव.

            मंगळवार, दि. 25 मे, 2021  रोजी सकाळी 08.00 वाजता शासकीय विश्रामगृह कळमनुरी, जि. हिंगोली येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण करतील.  

****

21 May, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 100 रुग्ण ; तर 73 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 548 रुग्णांवर उपचार सुरु तर चार रुग्णांचा मृत्यू

 

 हिंगोली, (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यात 100 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 02 व्यक्ती, वसमत परिसर 02 व्यक्ती, सेनगांव परिसर 05 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 42 व्यक्ती, औंढा परिसर 10 व्यक्ती, कळमनुरी परिसर 13 व्यक्ती, सेनगाव परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 23 व्यक्ती असे एकूण 100 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 73 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 211 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 30 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 241 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 222 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 346 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 548  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 328 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****