हिंगोली,
(जिमाका) दि. 25 : संजय बालासाहेब देशमुख व इतर जिल्हा परिषद सदस्यांनी
जिल्हा परिषद हिंगोलीच्या शिक्षण व अर्थ सभापती सौ. रत्नमाला प्रभाकरराव चव्हाण
यांच्या जिल्हा परिषद अंतर्गत कामकाजावर नाराज असून असमाधानी आहेत. त्यांच्या
कामकाजावर विश्वास नसल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम
1961 चे कलम 87 अन्वये श्रीमती रत्नमाला प्रभाकरराव चव्हाण सभापती, शिक्षण व अर्थ
समिती जि. प. हिंगोली यांच्या विरुध्द अविश्वास ठराव दाखल केला केला आहे. असून उक्त ठरावावर विचार करुन सभा बोलविण्यात
यावी असे नमूद केले आहे.
महाराष्ट्र
जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 49 (3) व (4) च्या तरतुदी
नुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी कोव्हिड-19 च्या नियमाचे पालन करुन उक्त सभापती
विरुध्द जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 49 (3) अन्वये अविश्वास
ठराव पारीत करण्यासाठी दि. 04 जून 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा परिषद
सभागृहात जिल्हा परिषदेची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत उक्त सभापती
विरुध्द अविश्वास ठराव पारीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिनियमातील कलम
49 (4) नुसार पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांना प्राधिकृत
केले आहे.
****
No comments:
Post a Comment