कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुधारीत आदेश निर्गमीत
हिंगोली, (जिमाका) दि. 5 : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19)
प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च,
2021 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना
निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड-19)
नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक
आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागाचे मुख्य
सचिवांच्या दि. 13 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये,
राज्यातील कोविड-19 च्याअनुषंगाने दि.30 एप्रिल, 2021
रोजीपर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना नुसार सुधारीत आदेश
निर्गमित करण्यात आल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या
अनुषंगाने दि. 1 मे, 2021 रोजी सकाळी
7.00 पासून ते दि. 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत निर्बंध घालण्यात आले होते.
त्यानुसार दिलेल्या सूचना व जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव पाहता नव्याने आदेश
निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशातही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिंगोली यांना प्राप्त अधिकारानुसार खालील सेवेच्या बाबतीत सुधारित आदेश निर्गमित केले आहेत.
यामध्ये हिंगोली जिल्ह्यात किराणा दुकाने, भाजीपाला
विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रेते
(चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे),
पाळीव प्राणी खाद्य विक्रेते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य
(वैयक्तिक/संस्थेसाठी) विक्रेते, ही दुकाने / आस्थापना दि. 6 मे, 08 मे, 10 मे, 12 मे व 14 मे 2021
रोजी पासून एक दिवस आड नुसार सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू करण्यास
परवानगी राहील.
सदर कालावधीत फक्त दुध विक्री केंद्र/विक्रेते यांना
या कालावधीत सकाळी 07.00 ते सकाळी 10.00 वाजता व सायंकाळी 06.00 ते रात्री 9.00
वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी असेल. ई- कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. जिल्ह्यातील
एपीएमसी बाजार, कृषी संबंधित सर्व दुकाने (जसे की खते, बी, बियाणे, कृषी साहित्य/ अवजारे,
गॅरेज, टायर विक्री/ दुरुस्ती दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, मौंढा इत्यादी दुकाने/
आस्थापना दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत चालू राहतील. तसेच अत्यावश्यक
व्यतिरिक्त जिल्ह्यातील उर्वरित दुकाने / आस्थापना यांना दिनांक 6 मे,8मे,10मे,12मे
व 14 मे, 2021 या कालावधीत सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत केवळ घरपोच सेवा
पुरवण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्फत पास उपलब्ध करुन घ्यावेत. जिल्ह्यातील खानावळ/
रेस्टॉरंट यांना केवळ घरपोच सुविधा देण्यासाठी दिनांक 6 ते 15 मे 2021 या कालावधीत
सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत परवानगी राहील.
कार्यालयीन उपस्थिती : सर्व शासकीय
कार्यालयातील (केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) उपस्थिती 15% राहील. परंतु
फक्त कोव्हिड-19 च्या संबंधित अत्यावश्यक सेवेची कार्यालये वगळून. ज्या शासकीय
कार्यालयांना 15% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे. त्या
कार्यालय प्रमुखांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाची परवानगी घेणे
बंधनकारक राहील. दि. 13 एप्रिल, 2021 च्या शासन आदेशान्वये कार्यालयातील उपस्थिती
एकूण कर्मचाऱ्याच्या 15% किंवा 5 कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तेवढे कर्मचारी
कार्यालयात उपस्थित राहतील. दि.13
एप्रिल, 2021 च्या शासन आदेशामधील मुद्दा क्र.2 नुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित
कार्यालयीन कामासाठी उपस्थिती कमीत कमी 15% असावी. परंतु कोणत्याही परीस्थितीत 50%
च्या वर नसावी. तसेच अत्यावश्यक सेवे संबंधित प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या
कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी ठेवावी परंतु 100% पर्यंत आवश्यकतेनुसार ठेवता
येईल.
लग्न समारंभ : या कालावधीत आयोजित करण्यात आलेले लग्न सोहळे
केवळ नोंदणी पद्धतीने (Court Marriage) पार पडता येईल. इतर अन्य कोणत्याही ठिकाणी
लग्न सोहळा पार पाडता येणार नाही.
खाजगी
प्रवासी वाहतूक: फक्त निकडीचे किंवा
अत्यावश्यक सेवेसाठी किंवा वैध कारणासाठी वाहन चालक व वाहनाच्या प्रवासी
क्षमतेच्या 50% च्या मर्यादेपर्यंत ई- पासद्वारे प्रवास करता येईल. अत्यावश्यक
सेवा किंवा वैद्यकीय कारणासाठी किंवा न टाळण्यासारख्या कार्यक्रमासाठी जसे
अंत्यविधी किंवा कुटुंबातील गंभीर आजारी व्यक्तीसाठी ई-पासद्वारे परवानगी घेवून प्रवास करता येईल.
जर यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास रु.10,000/- दंड लावण्यात येईल. खाजगी
प्रवासी बसेसना (Travels) वाहतूक
करण्यास या कालावधीत पूर्णत: बंदी राहील.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक : राज्य शासकीय (MSRTC) किंवा स्थानिक
प्राधिकरणाच्या मालकीची वाहने यांची कार्यालये केवळ शासन नियमाप्रमाणे कार्यरत
राहतील. हिंगोली जिल्ह्यातील आगारातून सुटणाऱ्या सर्व बसेस या कालावधीमध्ये बंद
राहतील. तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या
बसेसच्या व्यवस्थापनासाठी बस स्थानक कार्यरत राहतील. परंतु बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेस शासकीय बस
स्थानका शिवाय इतर कुठेही थांबणार नाहीत.
बँका : जिल्ह्यातील
सर्व बँका या कालावधीत त्यांच्या नियमित वेळा पत्रकानुसार केवळ कार्यालयीन
कामकाजासाठी सुरु राहतील. तसेच सदर कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी व
व्यापाऱ्यांच्या व्यवहारासाठी सुरु ठेवता येतील. नागरिकांसाठी बँका दिनांक 6 मे,
8मे, 10 मे, 12 मे व 14 मे, 2021 या
कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत चालू राहतील.
उद्योग : जिल्ह्यातील जे नोंदणीकृत
उद्योग आहेत त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कर्मचारी /
कामगारांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे कडून
ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील.
दुय्यम
निबंधक कार्यालये : दुय्यम निबंधक कार्यालयांबाबत या कालावधीत जिह्यातील सह दुय्यम
निबंधक वर्ग-2 हिंगोली व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये हे दस्तनोंदणी व
इतर अनुषंगिक व्यवहार करण्याकरिता सर्व नागरिकांसाठी दि. 6 मे,8 मे, 10 मे, 12 मे
व 14 मे, 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत चालू राहतील. इतर वेळेत सदर
कार्याल्ये त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी चालू राहतील.
सदर आदेश हे हिंगोली जिल्ह्यात दिनांक 6
मे, 2021 रोजी पासून सकाळी 7.00 ते दिनांक 15 मे, 2021 चे सकाळी
7.00 वाजेपर्यत लागू राहणार आहेत. या आदेशातील सूचनांचे सर्व
नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची
जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व
उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित
अधिकारी / कर्मचारी यांची असणार आहे.
या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ
केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा
2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम
1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित
पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी करावी.
****
No comments:
Post a Comment