21 May, 2021

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी दिली प्रतिज्ञा

 


हिंगोली, (जिमाका) दि. 21 : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.

यावेळी महसूल विभागाचे तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजेश जोशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: