एकही पात्र विद्यार्थी
शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि.10: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय,
अनुदानित, विना अनुदानित , कायम विनाअनुदानीत महाविद्यालयांने सन 2020-21 करीता पात्र
विद्यार्थ्यांना आपल्यास्तरावरुन आवश्यक ती माहिती देऊन विद्यार्थ्यांचे भारत सरकार
शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज महाडिबिटी पोर्टलवर भरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे
आणि एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे
आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी
केले आहे.
भारत सरकार पोस्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीच्या सर्व
योजना सन 2018-19 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या महाडिबिटी या
संकेतस्थळावरुन राबविल्या जातात. या संकेत स्थळामार्फत विद्यार्थ्यांना आधार संलग्न
बँक खात्यावर थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.
परंतू अद्यापही काही महाविद्यालयांमध्ये
विद्यार्थ्यांनी सन 2020-21 करीता पात्र असूनही अर्ज केलेले नाहीत. महाविद्यालयांनी
राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली नाही.
कोरोनाच्या काळात अनेक
विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे नसल्यामुळे पात्र असूनही विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरू शकले
नाहीत, असे निदर्शनास आले आहे. तेव्हा महाविद्यालयांनी आपल्यास्तरावरुन विद्यार्थ्यांना
आवश्यक ती माहिती देऊन विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज महाडिबिटी पोर्टलवर
भरण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, असेही प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment