बालके दत्तक घेणाऱ्यांसाठी महिला
बालविकास विभागाचे आवाहन
· नागरिकांनी दत्तक बालके स्विकारणेबाबत चूकीच्या
अफवांवर विश्वास ठेवू नये
हिंगोली, (जिमाका)दि.6: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोव्हीड-19 मुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्याने
अनाथ झालेली बालके दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे चूकीचे संदेश फेसबुक व व्हॉट्सॲपवर
फिरत आहेत. परंतू हे मेसेजेस चुकीचे असुन कायद्यानुसार
अशाप्रकारे बालके दत्तक घेणे बेकायदेशीर आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडू नये याकरीता
महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रन (इंडिया) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने
मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षास संपर्क करण्यासाठी 8308992222 आणि
7400015518 या मोबाईल क्रमकांवर सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वेळेत संपर्क साधावा.
अशाप्रकारे कोव्हीड अथवा इतर कोणत्याही
कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास कोणीही नातेवाईक स्विकारण्यास तयार
नसतील. तर अशा बालकांसाठी उपरोक्त नमूद हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधुन माहिती द्यावी.
वरील दिलेल्या संपर्क क्रमांकावर साधावा. तसेच बालकांसाठी या पूर्वी सुरु असलेली हेल्पलाईन
ही उपलब्ध असल्याचे सहाय्यक आयुक्त महिला व बाल विकास विभाग, तथा कार्यक्रम व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment