हिंगोली, (जिमाका) दि. 31 :
राज्य शासनाने रिक्षा परवाना धारकांना 1500 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले
आहे. हे अनुदान रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा
करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी रिक्षा चालकांनी www.transport.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे
आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांनी
या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यासाठी वरील दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी
करावी. तसेच ज्या ऑटोरिक्षा धारकांना आधार नोंदणी अद्यावत नसल्याने उपरोक्त
पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे त्यांच्या सोईसाठी आधारकार्ड नोंदणी
सुविधा केंद्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे लवकरच सुरु
करण्यात येत आहे.
या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,
हिंगोली मध्ये रिक्षा संघटना, चालक यांना आवश्यक मदत करण्यासाठी तसेच प्रणालीवर
प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी मदत कक्ष (मो.क्र.9021484105) स्थापन करण्यात
आला आहे.
सर्व परवाना धारक रिक्षा चालक, संघटनांनी उप
प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment