· मुलगा पुष्कराजने दिला मुखाग्नी
यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. तसेच पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून स्व. खासदार राजीव सातव यांना मानवंदना देण्यात आली.
स्व. खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर
मागील 23 दिवसापासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर त्यांचे
काल रुग्णालयात निधन झाले. स्व. सातव हे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद,
विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी
अल्प कालावधीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राज्याच्या, देशाच्या नकाशावर
हिंगोलीची ओळख निर्माण केली.
कळमनुरी येथे खासदार राजीव सातव यांचे पार्थिव आज सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर त्यांच्या परिवातील सदस्यासह हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्य व्यवसाय मंत्री असलम शेख, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनानी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, राजू नवघरे, तान्हाजी मुटकुळे, बालाजी कल्याणकर, अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार शिवाजी माने, तुकाराम रेंगे, माजी आ. संतोष टारफे यांनी स्व. राजीव सातव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. सातव हे पंचायत
समिती सभापती ते खासदार, देशाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवून
आपले कर्तृत्व त्यांनी सिध्द केले. त्यांच्या निधनाने कळमनुरीचे नाही तर जिल्हा,
राज्य व देशाचे नुकसान झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण
केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जिद्दीने काम करणारा,
लोकसभेत चांगले प्रश्न मांडणारा तरुण सहकारी गमावला आहे. स्व. सातव यांनी कमी वयात
अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारुन ते यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. ते अत्यंत
कमी वयात गेल्याने जड अंतकरणाने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अत्यंत प्रतिभाशाली, अभ्यासू
तसेच मराठवाड्याचे उज्वल भविष्य निर्माण करणारा नेता गमावला असल्याची भावना व्यक्त
करुन श्रध्दांजली अर्पण केली.
खासदार हेमंत पाटील यांनी स्व. राजीव सातव यांनी कमी वयात
राजकारणात झेप घेतली. तसेच सर्वांशी मैत्रीपूर्ण व सौहार्दाचे संबंध होते. त्यांनी
देशाच्या राजकारणात ठसा उमटविला असल्याची भावना व्यक्त करुन मा. मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांच्या वतीने श्रध्दांजली अर्पण केली.
तसेच याप्रसंगी गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनानी, आमदार
संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी
आमदार संतोष टारफे यांनीही आपल्या भावना व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पटेल यांनी सोनिया
गांधी यांच्यावतीने, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहूल गांधी
यांच्या वतीने तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रियंका गांधी
यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी स्व. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील
नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment