05 May, 2021

विक्री झालेल्या भारत स्टेज-06 वाहनांच्या नोंदणी बाबत सूचना जारी

 

विक्री झालेल्या भारत स्टेज-06 वाहनांच्या नोंदणी बाबत सूचना जारी

 

हिंगोली, (जिमाका) दि. 5 : परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत दिनांक 13 एप्रिल,2021 पूर्वी विक्री झालेल्या वाहनांच्या नोंदणी बाबत सूचना प्राप्त झाल्या असून त्या सुचना पुढील प्रमाणे असल्याचे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, हिगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

यासुचनामध्ये भारत स्टेज-6 या वाहनाची विक्री दिनांक 13 एप्रिल, 2021 पूर्वी झालेली  आहे अशा वाहनांच चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन  विक्रेत्याने  ऑनलाईन अर्ज, फॉर्म क्र. 20,21  विमा पुरावा व पत्याचा पुरावा (वितरकांनी प्रमाणीत करुन) सादर केल्यास अर्ज वाहन नोंदणीसाठी  स्विकारण्यात यावा. वाहन वितरकांनी वरीलप्रमाणे अर्ज सादर करतेवेळी त्यांनी सर्व कागदपत्र तपासली असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे व सदर प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चेसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्यावर पाठवावे तसेच वाहन वितरकांनी वरीलप्रमाणे  अर्ज सादर करतवेळी एक हमीपत्र सादर करावे हमीपत्रात पुढीलप्रमाणे मजकूर असावा.

कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे मी वाहन नोंदणीसाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याची विनंती करीत आहे. या नोंदणी संदर्भाने सर्व कायदेशीर जबाबदारी माझी असेल. ऑनलाईन  वाहन नोंदणीची ही सवलत संबंधीत  शहरातील लॉकडाऊन आदेश मागे घेण्याच्या दिनांकापर्यंतच आहे. याची मला जाणीव आहे. परिवहन कार्यालयाने सदर वाहने तपासणीसाठी सादर करण्याचे निर्देश दिल्यास सदर वाहने शक्य तितक्या लवकर विभागाचे मोटार वाहन निरीक्षक  यांच्या समक्ष प्रत्यक्ष तपासणीसाठी हजर करण्याची मी हमी घेत आहे. उपरोक्त तसेच नोंदणी अधिकाऱ्यांनी या संदर्भाने दिलेल्या कोणत्याही निर्देशाचे मी पालन  न केल्यास, माझे व्यवसाय प्रमाणपत्र रद्द होऊ शकते तसेच माझ्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, याची मला जाणीव आहे. ही कार्यपध्दती ही 13 एप्रिल, 2021 पूर्वी विक्री झालेल्या भारत स्टेज-06 वाहनांसाठीच केवळ लागू असेल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे

0000

 

No comments: