हिंगोली,
(जिमाका) दि. 25 : ज्या निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती
वेतन धारकांनी आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत हयातीचे प्रमाणपत्र अद्यापपर्यंत
सादर केले नाही त्यांनी तातडीने बँकेत सादर करुन त्याची साक्षांकित प्रत कोषागार कार्यालयाच्या to.hingoli@zillamahakosh.in या ई-मेल पत्यावर पाठवावेत. तसेच ज्या बँकेकडे
हयात प्रमाणपत्र जमा झाले असतील त्यांनीही कोषागार कार्यालयाकडे विनाविलंब पाठवावेत,
असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment