पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या
हस्ते
जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना
निर्मल ग्राम पुरस्कार वितरण
हिंगोली, 15:- स्वच्छ भारत
मिशन (ग्रा) जिल्हा परिषद, हिंगोलीतंर्गत सन 2012-2013 मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार
प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पुरस्काराचे
वितरण करण्यात आले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती हिंगोली तालुक्यातील - 01, वसमत तालुक्यातील - 07 , कळमनुरी तालुक्यातील
-12, सेनगावं तालुक्यातील -04, औंढा नागनाथ तालुक्यातील-02 अशा एकूण 26 ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई
यशवंते, सर्वश्री. आमदार तान्हाजी मुटकुळे, रामराव वडकुते, संतोष टारफे , जयप्रकाश
मुंदडा, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, प्र. मुख्य कार्यकारी
अधिकारी नईम कुरेशी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एन. देशमुख, मुख्य कार्यकारी
अधिकारी (सामान्य) निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क./पं) श्रीमती तृप्ती
ढेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) श्रीमती दिपाली कोतवाल यांची प्रमुख
उपस्थिती होती.
हिंगोली
तालुक्यातील कलगांव ग्रामपंचायतीला पुरस्कार रक्कम रुपये 3 लाख , तर कळमनुरी
तालुक्यातील भुरक्याचीवाडी, बिबगव्हाण, कवडी ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम
रुपये 1 लाख 50 हजार.
कळमनुरी
तालुक्यातील असोला या गावास पुरस्कार रुपये 2 लाख, चिंचोर्डी ग्रामपंचायतींना
पुरस्कार रुपये 2 लाख, ढोलक्याची वाडी, कळमकोंडी खु., कवडा, पिंपरी बु, यांना
पुरस्कार प्रत्येकी 3 लाख रुपये, शिवणी बु. व उमरा या ग्रामपंचायतीस रक्कम रुपये 6
लाख तर जाभरुन ग्रामपंचायतींला पुरस्काराची
रक्कम 1 लाख.
सेनगांव तालुक्यातील
बोरखेडी, पारर्डी व शिवणी खु. ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रत्येकी 1 लाख 50 हजार
तर ताकतोडा ग्रामपंचायतींना पुरस्कार रक्कम रुपये 4 लाख अशी वितरीत करण्यात
आली.
तसेच वसमत
तालुक्यातील भोपरीगांव, लोळेश्वर, तेलगांव ग्रामपंचायतींना पुरस्काराची प्रत्येकी
रक्कम रुपये 1 लाख 50 हजार, तर चिखली, कोरटा, कुरुंदवाडी, टाकळगांव
ग्रामपंचायतींना प्रत्यकी 3 लाख रुपये पुरस्कार
.
औंढा तालुक्यातील
लक्ष्मणाईक तांडा या ग्रामपंचायतींना एकूण पुरस्काराची रक्कम 1 लाख 50 हजार तर व
लोहरा खु. यांना 3 लाख.
****
No comments:
Post a Comment