12 August, 2016

हिंगोली दि. 12 :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार  देण्यात येतो.
            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालायांना अनुक्रमे रुपये 50 हजार, रुपये 30 हजार, रुपये 20 हजार, रुपये 10 हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.
            राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार रु. रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. 15 हजार रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
            सन 2016-17 पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 10 सप्टेंबर, 2016 पर्यंत व्दिप्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन किरण धांडोरे, ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                           *****

No comments: