स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
हिंगोली दि. 12 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दिनांक 14 व 15 ऑगस्ट,
2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 14 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने औंढा नागनाथ जि.
हिंगोली कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता औंढा नागनाथ येथे आगमन. दुपारी 12.00 वाजता लोटस बाल रुग्णालयाचे
उदघाटन (स्थळ : इंदिरानगर,
हिंगोली-परभणी रोड, औंढा नागनाथ, जि. हिंगोली. दुपारी 1.00 वाजता शासकीय वाहनाने कडोळी ता. सेनगाव जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता कडोळी ता. सेनगाव
येथे आगमन व राखीव. सोईनुसार शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 15 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 9.05 वाजता
भारतीय स्वातंत्र्याच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण. (स्थळ :- जिल्हाधिकारी
कार्यालय प्रांगण, हिंगोली) दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक (स्थळ
:- जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली) दुपारी 4.00 वाजता शासकीय वाहनाने औंढा नागनाथकडे
प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता औंढा नागनाथ येथे आगमन व दर्शन. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय वाहनाने जिंतूर - जालना
- औरंगाबाद - अहमदनगर मार्गे पुणेकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment