01 August, 2016

नगर परिषद कळमनुरी येथील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम

हिंगोली, दि. 1 :- नगर परिषद कळमनुरी येथील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे असणार आहे. यामध्ये :- 1) प्रभागाचे (वार्डाचे नाव) किंवा क्रमांक - नगर परिषद कळमनुरी प्रभाग क्र. 3 अ, 2) अ निर्वाचन अधिकाऱ्याचे नाव श्री. अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी, कळमनुरी, 2) ब सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्याचे नाव - श्रीमती प्रतिभा गोरे, तहसिलदार कळमनुरी, 3) नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ - गुरूवार दि. 11 ऑगस्ट, 2016 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, 4) नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची जागा – तह‍सिल कार्यालय कळमनुरी, 5) नामनिर्देशनपत्राच्या छाननीची तारीख - शुक्रवार दि. 12 ऑगस्ट, 2016 सकाळी 11.00 वाजल्यापासून, 6) नामनिर्देशनपत्रे छाननी व मार्ग घेण्याचा जागा - तहसिल कार्यालय कळमनुरी, 7) विद्यिग्राह्य रीतीने नामनिर्दिष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादी प्रसिध्द करण्याची तारीख - शुक्रवार दि. 12 ऑगस्ट, 2016, 8) उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख - गुरूवार दि. 18 ऑगस्ट, 2016 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, 9) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख - दि. 19 ऑगस्ट, 2016, 10) मतदान ज्या तारखेस किंवा तारखास आणि ज्या वेळी घेण्यात येईल. ती तारीख किंवा तारखा व वेळ – रविावार दि. 28 ऑगस्ट, 2016 सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत, 11) मतमोजणीची तारीख व वेळ - सोमवार दि. 29 ऑगस्ट, 2016 सकाळी 10.00 वाजल्यापासून, 12) मतमोजणीचे ठिकाण - तह‍सिल कार्यालय कळमनुरी येथे होणार आहे.
                                                            ***** 


No comments: