अद्यावत व्यायामशाळा कुस्ती, ज्युदो, कराटे व इतर खेळांच्या अनुदानासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 20 :- महाराष्ट्र कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी व्यायाम शाळा,
तालमी व आखाड्याचे योगदान महत्वाचे आहे. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन सुदृढ
नागरिक तयार करणे व अत्याधुनिक व्यायाम साहित्य कुस्ती, ज्युदो, कराटे या कलेच्या विकासासाठी
अद्यावत मॅट व इतर खेळाचे आधुनिक साहित्य क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी
संस्था, शैक्षणिक संस्था, मंडळे, संघटना यांना व्यायामचे आधुनिक साहित्य, कुस्ती, ज्युदो
व कराटे या खेळाच्या विकासासाठी मॅट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांना अद्यावत व्यायामशाळा
कुस्ती, ज्युदो, कराटे व इतर खेळाच्या विकासासाठी अनुदान या योजनेंतर्गत अत्याधुनिक
व्यायाम साहित्य शासनातर्फे खरेदी करुन उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी शासनातर्फे
कमाल रु. 1.00 लाख खर्च करण्यात येतो तथापि मंजूर आर्थिक सहाय्याच्या 25 टक्के संस्थेचा
हिस्सा असे अत्याधुनिक साहित्य संचालनालयस्तरावरुन पुरविण्यात येते.
संस्थेकडे
स्वत:च्या मालकीची जमीन अथवा दीर्घ मुदतीच्या करारावर उपलब्ध असलेल्या जमीनीवर किमान
500 चौ. फु. चटई क्षेत्राच्या व्यायाम गृहासहीत भांडारगृह/कार्यालयाची खोली व अर्जात
नमुद केलेल्या बाबीच्या मुळ कागदपत्रासह प्रस्ताव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी
यांच्याकडे दि. 30 ऑगस्ट, 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे
आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment