ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
हिंगोली दि. 12 :- ठक्कर
बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना जि. हिंगोली सन 2016-17 अंतर्गत नवीन कामाचे
प्रस्ताव मागविण्यात येत आहे. ज्या गावामध्ये एकुण लोकसंख्येच्या तुलनेत
आदिवासींची लोकसंख्या 50 टक्केपेक्षा अधिक असेल अशा गावात विविध विकास कामे
प्रस्तावित करून सरपंच/ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांचेमार्फत कामाचे परीपुर्ण
प्रस्ताव या कार्यालयास बातमी प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसांचे आत सादर करावयाचे
आहेत. या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही.
प्रस्ताव
सादर करतांना खालील दिल्याप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत व प्रस्ताव दोन
प्रतीमध्ये सादर करावे. यामध्ये 1) तहसिलदार यांचे 50 टक्केपेक्षा जास्त आदिवासी
लोकसंख्या असलेले प्रमाणपत्र. 2) ग्रामपंचायतचा बहुमताने मान्य झालेला ठराव. 3)
प्रस्तावित काम यापुर्वी कोणत्याही योजनेतुन झालेले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. 4)
कामाचे अंदाजपत्रक. 5) कामाचा स्थळदर्शक नकाशा. 6) कामाच्या जागेचे फोटो. 7) काम
करावयाच्या जागेचे 7/12 किंवा 8 अ.
गावाच्या
गरजेनुसार कामांना प्राधान्य देवुन खालीलप्रमाणे कामे घेण्यात यावी. 1) पाणी
पुरवठा योजना, पिण्याच्या शुध्द पाण्याची सोय, फिल्टर प्लाँट उभारणे. 2) सिमेंट
काँक्रीट रस्ता. 3) नाली व गटार बांधकाम. 4) सार्वजनिक शौचकुप व मुताऱ्यांचे बांधकाम.
5) एल.इ.डी. विद्युतीकरण, सौरउर्जा पथदिवे. 6) समाज मंदिर, वाचनालय, मंगल कार्यालय
बांधकाम. 7) स्मशानमुमी बांधकाम. 8) तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास. 9) नदीकाठची
संरक्षण भिंत, घाट बांधणे. असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प
अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
*****
No comments:
Post a Comment