व्यायाम शाळा साहित्य अनुदानासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 22 :- जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाच्या वतीने ज्या संस्थांना व्यायाम शाळा विकास योजना (सर्वसाधारण/विशेष घटक)
बांधकामासाठी मार्च 2016 पर्यंत अनुदान मंजुर करण्यात आले होते अशा संस्थांनी सन
2016-17 या आर्थिक वर्षाकरीता व्यायाम शाळा बांधकामाचे व्दितीय हफ्ता प्रस्ताव व ज्या
संस्थांनी व्यायाम शाळा बांधकाम पुर्ण केले आहेत अशा संस्थांनी व्यायाम साहित्याकरीता
प्रस्ताव या कार्यालयास दि. 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर
करावेत.
विहित मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास
अशा संस्थांना अनुदान मंजुर केले जाणार नाही याची संबंधित संस्थेने नोंद घ्यावी, असे
आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment