महसुल राज्यमंत्री संजय राठोड यांचा
हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली,
दि. 21 :- राज्याचे महसुल राज्यमंत्री श्री. संजय राठोड हे दिनांक 25 ऑगस्ट,
2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरूवार, दि. 25 ऑगस्ट, 2016 रोजी सकाळी 9.00 वाजता
शासकीय वाहनाने जिंतूर-अमरगड मार्गे सेनगांव
जि. हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 ते 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, सेनगांव जि.
हिंगोली येथे आगमन व सामाजिक कार्यक्रम, वसंतराव नाईक पुण्यतिथी महोत्सवास उपस्थिती.
(स्थळ:- शासकीय विश्रामगृह, सेनगाव, जि. हिंगोली) सकाळी 11.45 वाजता शासकीय वाहनाने
हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव.
दुपारी 12.30 ते 01.30 वाजता जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालय,
हिंगोली येथील जिल्हा आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.30 ते 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह,
हिंगोली येथे राखीव. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता हिंगोली, सेनगांव, औंढा-नागनाथ, वसमत,
कळमनुरी येथील पक्ष कार्यकर्ते व समाजातील कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह, हिंगोली
येथे बैठक व चर्चा. दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने कळमनुरी मार्गे शेंबाळ पिंप्री-पुसद-यवतमाळकडे
प्रयाण.
*****
No comments:
Post a Comment