गोळीबार
सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता
हिंगोली, दि. 20 :- जिल्ह्यात नजीकच्या काळात गणपती, नवरात्र व इतर
महत्वाचे बंदोबस्त असल्याने हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी
तसेच दंगल नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथकात नेमणुकिस असलेले पोलीस कर्मचारी यांचा
वार्षिक गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याचे हिंगोली येथील पोलीस अधिक्षक यांनी नमुद
करून दिनांक 20 ते 31 ऑगस्ट, 2016 या कालावधीत
घेण्याचे नियोजित केलेले आहे. तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न.
25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र
जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम
33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान
वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हिंगोली
यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे,
सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये,
अशा सुचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व
संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे
वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी
करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment