वृत्त क्र. 10
दिनांक : 12 जानेवारी 2018
जिल्हाधिकारी कार्यालयात
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद
यांना अभिवादन
हिंगोली,
दि. 12 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिनीयार यांनी
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्री. बोरगावकर यांच्यासह
विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदी उपस्थित होते.
*****
वृत्त क्र. 11
सोमवारी
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
हिंगोली,
दि. 12 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क, व समान संधी असा मुलभूत हक्क
दिलेला आहे.
त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ
मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या
तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ
मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून जिल्हा
स्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात दि. 15 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला
लोकशाही दिन होणार आहे.
त्यानुसार ज्या महिलांना तक्रारी
करावयाच्या असतील त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत हिंगोली यांचे कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
वृत्त क्र. 12
इतर
मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थ्यांनी
थकित व्याज
सवलतीत भरण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 12 : महाराष्ट्र राज्य
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय
हिंगोली यांचे मार्फत विविध कर्ज योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास
प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अप् व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात
आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील थकीत वसूलीबाबत मा. सचिव विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
400032 यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला
असता एकूण थकीत रक्कम रु. 35.24 लक्ष इतकी असल्याने थकीत लाभार्थी त्यांचे
जामीनदार हमीपत्र/पगारपत्र धारकाचे वेतनातून कपात, गहाणखत (कर्ज बोजा नोंद उतारे)
इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966
मधील तरतूदीनुसार आर. आर. सी. इत्यादी अंतर्गत कार्यवाही करून वसुली करण्याबाबत
स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा
कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे कामकाज चालु झालेले आहे. त्यानुषंगाने
हिंगोली जिल्ह्यातील थकीत लाभार्थीना जाहीर आवाहन करण्यात येते की, महामंडळाकडून
31 मार्च, 2018 पर्यंत थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थींना 2 टक्के सवलत देण्यात
येणार आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व संबंधित लाभार्थीनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम
एकरक्कमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व कायदेशीर कार्यवाही
टाळावी, असे जिल्हा व्यवस्थापक अरुण एस. समुद्रे यांनी कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 13 दिनांक : 12 जानेवारी 2018
मागासवर्गीय
विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले
भारत सरकार
शिष्यवृत्ती संदर्भातील अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, निवार्ह भत्ता, विद्यावितने इत्यादी
योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो. सन 2017-18 या वर्षापासून
राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा-डिबीटी पोर्टल
मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे https://mahaeschol.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ स्थगित
करण्यात आलेले होते. परंतू काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा
फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतने इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने तो अदा
करण्यासाठी आता ई-स्कॉलरशिप हे संकेतस्थळ दि. 21 नोव्हेंबर, 2017 पासून पुन्हा
मर्यादीत कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
परंतू सदरचे
संकेतस्थळ सुरू होऊन एक महिना झाला असून सद्यस्थितीत महाविद्यालय स्तरावर सन
2015-16 व 2016-17 मधील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी, इ.
योजनेचे अर्ज प्रलंबित दिसून येत आहेत. या संदर्भात महाविद्यालयास वेळोवेळी
पत्राव्दारे व दूरध्वनीव्दारे सूचना देऊनही महाविद्यालयांनी मागासवर्गीय
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय गांभीर्यांने घेतला नसल्याचे दिसून येते. ही
बाब अतिशय गंभीर आहे.
तरी याव्दारे पुनश्च एकदा हिंगोली जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ
तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या स्तरावर असलेले
विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे सन 2015-16 व 2016-17 चे पात्र विद्यार्थ्यांचे
प्रलंबित आणि नुतणीकरणाचे प्रस्ताव दि. 15 जानेवारी, 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली यांच्या लॉगीनवर फॉरवर्ड करुन त्याची हार्डकॉपी कार्यालयास सादर
करण्यात यावी. अन्यथा प्रलंबित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करणे ही संबंधित
महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी असेल. भविष्यात सदर विद्यार्थी
शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास यास सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार
राहील, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 14
चित्रपट
अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शनपर परिसंवाद
हिंगोली,
दि. 12 : स्थानिक हिंगोली जिल्ह्यातील अभिनय करणाऱ्या युवक युवतींना सुवर्णसंधीच
एक दालन मिळणार आहे. ते म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा
उद्योग केंद्र हिंगोली व्दारा आयोजित चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन
पर परिसंवाद पर 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
सदर
कार्यक्रमामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये करीअर करू इच्छिणाऱ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन
दि. 17 ते 29 जानेवारी, 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसिध्द
अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक श्याम धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रभावी
संभाषण कौशल्य, व्हाईस मॉड्युलेशन, चेहऱ्यावरील हावभाव, शॉटकट डिव्हीजन्स, गीत
लिखाण, फिल्म निर्देशन, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर
कार्यक्रम हा सशुल्क असुन या कार्यक्रमाची नोंदणी करण्याची अंतिम दि. 17 जानेवारी,
2018 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक विकास उंडाळ मो. 8412089242 व
कोंडेकर अरुण मो. 8698770678 यांच्याकडे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,
व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
येथे आपले नाव आरक्षित करून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, या कार्यशाळेमध्ये फक्त 30
प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील. असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे
प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
वृत्त क्र. 15 दिनांक : 12 जानेवारी 2018
महाराष्ट्र
राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ
अभ्यासक्रमासाठी संस्थेने अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली,
दि. 12 : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत
राबविण्यात येत आलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता इच्छूक संस्थांकडून
/ व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा कालावधी दि. 15 डिसेंबर, 2017 ते दि. 16 जानेवारी, 2018
पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 17 जानेवारी, 2018 ते दि. 31 जानेवारी, 2018 पर्यंत
विलंब शुल्कासह आहे.
उपरोक्त
बाबत संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाचे www.msbve.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छूक संस्थांनी संकेत स्थळावरून सन 2018-19 साठी
प्रसिध्द केलेल्या माहितीपुस्तिकेमधुन आवश्यक परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व
त्यासोबत आवश्यक ते कागदपत्रे, चलन (अर्ज रक्कम व प्रक्रिया शुल्क रक्कमेचे)
इत्यादी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय,
यांचेकडे वरील कालावधीत जमा करावयाचे आहे.
अधिक
माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेशी
संपर्क साधावा अथवा www.msbve.gov.in
मंडळाच्या या संकेतस्थळावर पहावे.
*****
No comments:
Post a Comment