वृत्त क्र.12 दिनांक
: 06 जानेवारी 2018
फलोत्पादन पिकावरील किडरोग व व्यवस्थापनासाठी
हॉर्टसॅप प्रकल्प
हिंगोली, दि.6: फलोत्पादन पिकावरील किडरोग व व्यवस्थापन
प्रकल्प Hortsap 2017-18 सदर प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात 2014-15 पासून राबविण्यात येत आहे. Hortsap प्रकल्पातंर्गत आंबा, संत्रा, डाळींब, केळी या पिकांवर राबविल्या
जात असून हिंगोली जिल्ह्यात वसमत व कळमनुरी
तालुक्यात केळी पिकाचे क्षेत्र असल्यामुळे केळी या पिकावरील किडरोग सर्वेक्षक
सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्पात एम.डी.एस.फॅसीलीटीज, अमरावती या संस्थेकडून कंत्राटी
स्वरुपात 1) कांबळे विलास प्रकाश सं.प्रचालक, 2) मुलगीर संतोष किशोर, 3) कन्हेरकर पुंडलीक
सखाराम किडसर्वेक्षक म्हणून निवड केली असून उपविभाग स्तरावर किडनियंत्रक तथा कृषि पर्यवेक्षक
यांच्याकडून संनियंत्रण व इतर प्रकल्पातील
Advisory सल्ला देणे, Online Data
सं.प्र.मार्फत भरल्या जाते किंवा नाही हे पहाण्याचे काम होणार असून किडसर्वेक्षकांकडून
निवड केलेली सोमवार, मंगळवार दर दिवशी 2 गावातील
2 Fix व 2 Random शेतकऱ्याचे केळीवरील करपा व फुलकिडीचे सर्वेक्षण करुन बुधवारी संगणकावर डाटा
भरणे व गुरुवार , शुक्रवार चा सर्वेक्षण अहवाल शनिवारी उपविभाग स्तरावरुन कृषि विद्यापीठ
व Nic नवी दिल्ली यांना पाठवून आलेल्या Advisory सल्ला शेतकऱ्यांपर्यंत तालुका कृषि
अधिकारी यांच्यामार्फत क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत देण्यात येणार आहे.
योजनेचे उद्देश : केळी या पिकाचे सर्वेक्षण करुन
हंगामनिहाय किडरोगांच्या प्रादुर्भावा बाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे, किडरोगाच्या
आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे, किडरोगांचा प्रादुर्भाव
वेळीच लक्षात आल्याने पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे, किडरोगाबाबत
शेतकऱ्यांना प्रशिक्षीत करुन किडरोगाचे वेळीच व्यवस्थापन करणे, किडरोग प्रादुर्भावित
क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधीचा पुरवठा करणे,वारंवार येणाऱ्या
किडरोगा बाबत सांख्यीकी माहिती संकलीत करणे व कायम स्वरुपाच्या व्यवस्थापना बाबत कृषि
विद्यापीठांच्या सहाय्याने शिफारसी निश्चित करणे,भारतात केळीच्या उत्पादकतेच्या बाबतीत
महाराष्ट्र प्रथम क्रमांक आहे.शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा कार्यक्षमरित्या वापर
केल्यास प्रती हेक्टर 75 ते 100 टन उत्पादकता मिळणे शक्य आहे.
केळी लागवडीचे प्रामुख्याने तीन हंगाम मृग बहार-जुन- जुलै लागवड,कांदे बाग-ऑक्टोबर - नोव्हेंबर
लागवड,फेब्रुवारी फेब्रुवारी
केळी पिकासाठी अन्न द्रव्य व्यवस्थापन शेणखत 10 किलो
प्रती झाड, जैवीकखते : लागवडीच्या
वेळी शेणखतासोबत अझोस्पीरीलम व पी.एस.बी. प्रत्येकी 25 ग्रॅम प्रती झाड वापरावे.
रासायनिक खते
अ.क्र
|
|
युरीया
|
S.S.P.
|
म्युरेटा ऑफ पोटॅश(MOP)
|
1
|
लागवडी
नंतर 30 दिवसाचे आत
|
82
|
375
|
83
|
2
|
लावगडीनंतर
75 दिवसांनी
|
82
|
-
|
-
|
3
|
लावगडीनंतर
120 दिवसांनी
|
82
|
-
|
-
|
4
|
लावगडीनंतर
165 दिवसांनी
|
82
|
-
|
83
|
5
|
लावगडीनंतर
210 दिवसांनी
|
36
|
-
|
-
|
6
|
लावगडीनंतर
255 दिवसांनी
|
36
|
-
|
83
|
7
|
लावगडीनंतर
300 दिवसांनी
|
36
|
-
|
83
|
एकूण
|
435
|
375
|
332
|
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रकल्पा
अंतर्गत माहितीचा उपयोग करुन घ्यावा व उत्पादनात वाढ करावी असे उपविभागीय कृषि अधिकारी
वाघबी.आर.व कृषि पर्यवेक्षक बोथीकर
के.एच. यांनी आवाहन केले आहे .
00000
No comments:
Post a Comment