वृत्त क्र.11
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.5: मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी, राज्यभर 1 ते 15 जानेवारी 2018 या
कालावधीत ‘मराठी
भाषा संवर्धन पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने राज्यातील शासकीय,
निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व
खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 1 ते 15
जानेवारी 2018 या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’
साजरा करावा. मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक 23 नोव्हेंबर 2017
मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व
जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी
हिंगोली यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment