05 January, 2018

स्‍व.यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाड्मय पुरस्‍कारासाठी 31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन



वृत्त क्र.10                                                                                दिनांक : 05 जानेवारी 2018 

स्‍व.यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाड्मय पुरस्‍कारासाठी 31 जानेवारी पर्यंत प्रवेशिका

सादर करण्याचे आवाहन

        हिंगोली,दि.5: मराठी भाषेतील उत्‍कृष्‍ट वड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2017 करिता राज्‍य शासनाच्‍यावतीने देण्‍यात येणा-या स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाड्मय पुरस्‍कारांसाठी प्रवेशिका जिल्‍हाधिकारी कार्यालय, हिंगोली तसेच महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या  कार्यालयात दिनांक 31 जानेवारी, 2018 पर्यंत प्रस्‍ताव पाठवावेत.  
            दिनांक 1 जानेवारी,2017 ते 31 डिसेंबर, 2017 या कालावधीत  प्रकाशित झालेली प्रथम आवृत्‍ती  पुस्‍तके या स्‍पर्धेसाठी पात्र आहेत.  या स्‍पर्धेची नियमावली  व प्रवेशिका सचिव, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई यांच्‍या कार्यालयात तसेच मुंबई वगळता अन्‍यत्र संबंधित जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयात ( सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा)  विनामूल्‍य उपलब्‍ध होतील.
            महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षाखाली व महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या http;//msblc.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्‍ध होतील.  प्रवेशिका पूर्णतः  भरुन आवश्‍यक साहित्‍यासह सचिव महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाच्‍या कार्यालयात दिनांक 31 जानेवारी, 2018 पर्यंत सादर कराव्यात. लेखक / प्रकाशक या स्‍पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्‍हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
                                                                        00000

No comments: