लोकराज्यच्या ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ विशेषांकाचे
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते विमोचन
हिंगोली,दि.16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत प्रकाशित होणाऱ्या माहे
जानेवारीच्या लोकराज्य ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ या लोकराज्य विशेषांकाचे विमोचन
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज
करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सर्वसाधारण सहायक
अनिल चव्हाण, यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री चावरिया म्हणाले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पोलीस विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर आधारित जानेवारी-2018 चा ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ लोकराज्यचा दर्जेदार व वाचनीय असा विशेषांक प्रकाशित केला आहे. दरमहा प्रसिध्दी होणाऱ्या लोकराज्य मासिकात शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहितीचा समावेश असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मासिक असुन प्रत्येकाने ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ हा लोकराज्यचा पोलीस विशेषांक अवश्य घ्यावा, असे आवाहनही श्री. चावरिया यांनी यावेळी केले.

शासनाचे मुखपत्र असलेले या मासिकाची वाचकप्रियता आणि प्रभाव
अनन्यसाधारण स्वरुपाचा असून शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय, राबविण्यात येणाऱ्या
योजना, संकल्पना, इतर उपयुक्त माहिती घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे ‘लोकराज्य’ एक
प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. 'लोकराज्य' मासिकाची किंमत फक्त रु. 10/- इतकी असून
वार्षिक वर्गणी रु. 100/- एवढी आहे. तर 'उर्दू लोकराज्य' मासिकाची किंमत रु. 5/-
असून वार्षिक वर्गणी रु. 50/- एवढी आहे. तसेच 'महाराष्ट्र अहेड' या इंग्रजी
मासिकाची किंमत रु. 50/- असून वार्षिक वर्गणी रु. 500/- एवढी आहे. सदर वर्गणी
रोखीने किंवा धनादेशाद्वारे जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, हिंगोली येथे स्वीकारली जाते. या मासिकाचे
वर्गणीदारांना सदर मासिक त्यांनी दिलेल्या पत्यावर थेट पोस्टाद्वारे पाठविण्याची
सुविधा उपलब्ध आहे. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ या
मासिकाचे वर्गणी भरून वर्गणीदार होण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment