01 January, 2018

त्रैमासिक विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन भरावे



वृत्त क्र.02                                
                             त्रैमासिक विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन भरावे
        हिंगोली, दि.01:- माहे जानेवारी 2017 या महिन्याचे मासिक वेतन देयक दाखल करताना  सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांना   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे आपल्या आस्थापने वरील कर्मचाऱ्यांची माहिती बाबतचे  माहे डिसेंबर 2017 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 31 जानेवारी 2018 पर्यंत भरावयाची मुदत असून या कार्यालयाचे संकेत स्थळ  WWW.MAHASWAYAM.IN  वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन  दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयका सोबत जोडल्या शिवाय, मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले  जाणार नाहित, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सर्व कार्यालयांना या कार्यालया मार्फत  युजर आय.डी. व पासवर्ड  यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व कार्यालयानी आपले ईमेल आयडी , फोन नंबर , पत्ता, टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी , असे श्रीमती रेणुका तम्मलवार, सहायक संचालक , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी कळविले आहे.
0000

No comments: