जिल्ह्यात 27 नोव्हेंबर पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात
येणार
-जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली,दि.12: गोवर व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात 27
नोव्हेंबर पासून लसीरकण मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात जिल्ह्यातील
इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित गोवर-रुबेला कार्यशाळेत ते बोलत
होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड,
शिक्षणाधिकारी संदिप सोनटक्के, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, दिलीप बांगर,
श्री.कल्याणकर, डॉ. टेहरे, डॉ. कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी भंडारी पुढे म्हणाले की, भारत सरकारने 2020 पर्यंत गोवर या आजाराचे
निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून
नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम हाती घेण्याचे
ठरविले आहे. हि मोहिम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असून
पहिल्या सत्रात सर्व शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर
शाळेत न जाणारी मुले तसेच 9 महिने ते 3 वर्षापर्यंतची बालके यांच्याकरीता ही मोहिम
प्रभावीपणे राबविली जाईल. गोवर, रुबेला लसीकरण मोहिम ही 9 महिने ते 15 वर्षा आतील
मुलांमध्ये यशस्वीरितीने पार पाडण्यात येणार आहे. याकरीता नागरिकांमध्ये
लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे सर्व शाळांनी नियोजन करावे असे सूचित
केले. नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात
येणार असून, या मोहिमे दरम्यान सर्व शाळांमध्ये 10 वी पर्यंतच्या मुलांना हे
लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या नगरपालिकेच्या
विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था, यांच्या सहयोगातून ही मोहिम प्रभावीरित्या
राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. आपण सर्वांच्या
सह्योगातून जिल्ह्यात ही मोहिम 100 टक्के यशस्वीरित्या राबवू असा विश्वास
जिल्हाधिकारी अनिल भंडरी यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्यध्यापक यांची
उपस्थिती होती .
00000
No comments:
Post a Comment