त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन
सादर करण्याचे आवाहन
हिंगोली,दि.08: माहे ऑक्टोबर-2018 या महिन्याच्या मासिक वेतन देयके दाखल करताना सर्व
शासकीय / निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची
माहितीचे माहे सप्टेंबर-2018 अखेरचे ई आर 1 त्रैमासिक विवरणपत्र माहे 30 ऑक्टोबर,
2018 पर्यंत भरावयाचे आहे.
तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळ
www.mahaswayam.in वरुन ऑनलाईन ई आर 1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र
देयकासोबत जोडल्याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्विकारले जाणार नाहीत.
सर्व कार्यालयांना या कार्यालयामार्फत युजर आय.डी. व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले
आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी, फोन नंबर, पत्ता,
टॅन नंबर, पॅन नंबर टाकून आपले प्रोफाईल अपडेट करावी, असे सहायक संचालक कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता विभाग, हिंगोली यांनी कळविले आहे .
****
No comments:
Post a Comment