डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजनेच्या
प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
हिंगोली,दि. 1: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2018-19 मध्ये सिंचन विहिरी व जुनी विहीर दुरूस्तीसाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त अर्जाची छाननी कृषि विभाग, पंचायत समिती स्तरावर करण्यात आलेली आहे. प्राप्त प्रस्तावाची यादी त्रूटीच्या यादीसह पंचायत समिती स्तरावर दि. 3 ऑक्टोबर, 2018 रोजी डकविण्यात येणार आहे.
यादीमधील शेरा रकाण्यात दर्शविलेल्या त्रुटीची पुर्तता व ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे, परंतू सर्व मुळ कागदपत्रासह प्रस्ताव कृषि विभाग पंचायत समिती येथे अद्याप सादर केलेले नाही त्यांनी त्वरित त्रुटीची पुर्तता दि. 8 ऑक्टोबर, 2018 रोजीपर्यंत कृषि विभाग पंचायत समिती येथे सादर करावी. मुदतीनंतर सादर केलेल्या कागदपत्राचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment