आपत्ती
धोके निवारण दिनानिमित्त
आपत्ती
व्यवस्थापन देखावा स्पर्धेचे आयोजन
हिंगोली, दि.5: १३ ऑक्टोबर हा
दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके
निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी
जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा केला जातो त्याप्रमाणे हा
दिवस जिल्हास्तरावर आपत्ती धोके निवारण उपक्रम राबविण्यात यावेत असे शासन
स्तरावरून कळविण्यात आले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात विवीध कार्यक्रमासोबतच
आपत्ती व्यवस्थापन देखावा स्पर्धेचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
देखावा स्पर्धेचे आयोजन:स्पर्धेसाठी
माध्यमिक शाळा नावनोंदणी करू शकतात. (गट: १ शिक्षक व ५ विद्यार्थी) विषय: गाव जल व्यवस्थापन. (पावसाच्या
पाण्याचे व्यवस्थापन/सांडपाण्याचे व्यवस्थापन ई.),घरगुती जल व्यवस्थापन.
(पावसाच्या पाण्याचे/सांडपाण्याचे व्यवस्थापन ई.),भूकंप आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी/भूकंप
रोधक घर/जनजागृती/ई.),पुर आपत्ती व्यवस्थापन. (पूर्वतयारी/जनजागृती/उपलब्ध
साधनांचा वापर करून जिवितहानी टाळणे ई.),रस्ता अपघात व्यवस्थापन.
(पूर्वतयारी/जनजागृती/उपाययोजना ई.),वीज आपत्ती व्यवस्थापन.
(पूर्वतयारी/जनजागृती/उपाययोजना ई.),आग व्यवस्थापन.(पूर्वतयारी/घरातील,गावातील
तसेच कारखान्यातील आगीचे व्यवस्थापन/उपाययोजना ई.)
देखाव्याचा आकार: लांबी ४ ft.,
रुंदी ४ ft., उंची ३ ft.,सादरीकरण वेळ: देखाव्याच्या सादरीकरणास
विद्यार्थ्यांना ७ मिनिटे वेळ मिळेल, बक्षीस: परीक्षकांच्या समिती मार्फत
निवड झालेल्या विजेत्या ३ शाळांना दि.१३ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच खालीलप्रमाणे
बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
प्रथम शाळा:रु.१०,०००/-, द्वितीय
शाळा: रु.७,०००/-, तृतीय शाळा: रु.५,०००/-
वरीलप्रमाणे स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक दि. 6 ऑक्टोबर 2018 रोजी
सकाळी ११.०० वाजता दूरध्वनी क्र.९४०५४०८९३९ वर संपर्क साधून अथवा जिल्हाधिकारी
कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन नावनोंदणी करू शकतात. प्रथम
नावनोंदणी करणाऱ्या ४० शाळांची स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. स्पर्धेचे
ठिकाण: कल्याण मंडप,दिनांक:१२ ऑक्टोबर २०१८, वेळ: सकाळी ८.००
वाजता शाळांनी देखाव्यासह हजर राहावे. त्यानंतर परीक्षक समिती द्वारे सकाळी १०.३०
वाजता परीक्षण केले जाईल, असे निवासी
उपजिल्हाधिकारी, हिंगोली तथा मुख्य
कार्यकारी अधिकारी,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment