राष्ट्रीय
एकतादिनानिमित्त ‘एकता दौड’ संपन्न
हिंगोली,दि.31: सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दौड व इंदिरा गांधी यांच्या
स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात
आला. या दिनानिमित्त अग्रसेन चौक - बसस्टँड - इंदिरा गांधी चौक - महात्मा गांधी
चौक पर्यंत राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकता दौड रॅलीस
हिंगोली शहराचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, यांनी
हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची
उपस्थितांना शपथ दिली. यावेळी एसीबीचे उपअधीक्षक श्री. थोरात, जिल्हा अधिक्षक भूमी
अभिलेख श्री.जाधवर, नायब तहसीलदार, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.पाठक, श्री. गळगे
आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता’ शपथ
दिली. या एकता दौड मध्ये जिल्हा परिषद कन्या
प्रशाला, माणिक स्मारक विद्यालय, सरजूदेवी विद्यालय, सिक्रेड हायस्कूल या शालेय,
महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिकांनी, खेळाडु, स्वयंसेवी संस्था,
क्रीडा मंडळे सहभागी झाले होते.
***
No comments:
Post a Comment