निवृत्तीवेतनधारकांना
खाते क्रमांकाची अद्यावत माहिती सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.24: महाराष्ट्र बँकेच्या 51 शाखा बंद होणार असून बँक ऑफ बडोदा, विजया बँक , देना
बँक यांच्या शाखा विलीन होणार आहेत.ज्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्ती
वेतनधारकांचे खाते अशा बँकेत असेल तर
निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या बँकेकडे संपर्क साधून त्यांच्या
निवृत्तीवेतनाकरिताच्या खाते क्रमांकाविषयी होणाऱ्या बदलाची माहिती प्राप्त करुन
घेऊन ती माहिती कोषागार अधिकाऱ्यांना त्वरित सादर करावी , असे कोषागार अधिकारी
यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment